Wednesday, April 24, 2024
Homeनगरबालसंगोपन योजनेसाठी नेवाशातून 111 प्रस्ताव मंजूर

बालसंगोपन योजनेसाठी नेवाशातून 111 प्रस्ताव मंजूर

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

राज्य शासनाच्यावतीने आई किंवा वडिलांचे निधन झालेल्या शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो. वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतिमहा एक हजार रुपये रक्कम संबंधीतांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेसाठी नेवासा तालुक्यातून दाखल 160 पैकी 111 प्रस्ताव मंजूर झाले असल्याची माहिती बाल संरक्षण समिती अध्यक्ष हनिफ शेख व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

करोना एकल महिला पुनर्वसन समिती नेवासा व मिशन वात्सल्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे, तालुका समन्वयक कारभारी गरड, तालुका संरक्षण अधिकारी जगदीश शिरसाट, उमाप, कॉ. आप्पासाहेब वाबळे यांच्या उपस्थितीत शिबिर नेवाशात पार पडले. शिबिरासाठी शम्मी शेख, भास्कर नरसाळे, बाबाजी सांगळे, बाळासाहेब घोडके, राहुल आठरे, अंजली महामेर, विक्रम गोसावी, महादेव घोडके, प्रवीण वाघमारे, अण्णासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, सचिन भणगे, मदन लाड व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या