Thursday, April 25, 2024
Homeनगरबालाजी देडगाव यात्रेच्या दिवशी गावातील पाच वर्षीय बालक बेपत्ता

बालाजी देडगाव यात्रेच्या दिवशी गावातील पाच वर्षीय बालक बेपत्ता

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेतून पाच वर्षीय बालक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून सदर बालकाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीवर मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत बेपत्ता मुलाची आजी प्रमिला शिवाजी थोरात (वय 55) धंदा-मजुरी रा. बालाजी देडगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 20 ऑक्टोबर रोजी फिर्यादीचे पती शिवाजी थोरात नातवंडांना खाण्यासाठी खाऊ व खेळणी घेवून आले होते. सायंकाळी 6 जवजण्याच्या सुमारास सर्व नातवंडांनी आणलेला खाऊ खाल्ला. त्यानंतर फिर्यादीची सर्व नातवंडे व नातू सत्यम संभाजी थोरात (वय 5 वर्षे) असे सांकाळी साडेसहाच्या सुमारास घराच्या समोर देडगाव ते माका रोडवर खेळण्यासाठी गेले होते.

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सत्यम घरी आला नाही म्हणून फिर्यादीच्या घरातील सर्व नातेवाईकांनी सत्यम याचा आजूबाजूला तसेच गावात इतर ठिकाणी शोध घेतला असता सदर मुलगा मिळून आला नाही.

सत्यम याने त्यांच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असून त्याची उंची 3 फूट 5 इंच आहे. रंग काळासावळा असून सदर वर्णनाचा मुलगा आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 803/2021 भारतीय दंड विधान कलम 363 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या