Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

ओझे । वार्ताहर Oze

लखमापूर येथील माजी उपसरपंच वाल्मिक मोगल यांच्या शेतातील शेतमजुराचा मुलगा समीर विष्णु पवार ( वय 3 वर्ष ) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल केले होते . नंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे . केवळ नागरिकांच्या प्रसंगावधाना मुळे बालकांचे प्राण वाचले असले तरी वनविभागाची डोळझाक याला कारणीभूत ठरत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

भर दिवसा चार वाजेच्या सुमारास समीर ची आई अनिता व ताराबाई गायकवाड शेतातुन सरपण घेऊन जात असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने समीर वर हल्ला करत त्याला उसाच्या शेतात उचलून नेले. समीर सोबत त्याचे दोन लहान भावंडे, आई व अन्य माणसे पण होती, मात्र त्यांच्या डोळ्या देखत बिबट्याने समीर ला उचलून नेले.

या वेळी आई व ताराबाई यांच्या सह अन्य लोकांनी आरडा ओरडा केला, मात्र बिबट्या समीर ला घेऊन उसात गेला या वेळी झालेला आरडाओरडा मुळे परिसरातील सुमारे 100 ते 150 शेतकरी जमा झाले व थेट उसाच्या फडात घुसत समीर चा शोध घेतला असता सुमारे 50 ते 60 फूट आत मध्ये जखमी अवस्थेत समीर सापडला. त्याला तात्काळ दिंडोरी येथील आरोग्य केंद्रात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या ठिकाणापासून दोनच दिवसांपूर्वी हाकेच्या अंतरावरील माजी सरपंच आनंदराव मोगल यांच्या पाळीव कुत्र्यावर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले, त्या वेळी वनविभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने आज पुन्हा ही घटना घडल्याने वनविभागाच्या नाकारते पणा समोर आला आहे, या मुळे वनविभागाला शेतकऱ्यांनी मुले, पाळीव प्राणी बिबट्याचे खाद्य वाटतात की काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.

परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचा घटना दररोज घडायला लागल्या आहे. वनविभाग केवळ बघ्याची भूमिका घेत मुंग गिळून बसल्याने आमची बालके व पाळीव प्राणी यांचे जिवन धोक्यात आले आहे, यावर त्वरित बंदोबस्त न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल व बिबट्या जेरबंद होईपर्यंत आम्ही माघे हटणार नाही याला सर्वस्वी वनविभाग जबदर राहील

नानाभाऊ सोनवणे उपसरपंच लखमापुर.

जिवाची पर्वा न करता बालकाला जीवदान देण्यासाठी नागरिकांनी बिबट्याचे संकट समोर असतांनाही उसात घुसून बालकाला शोधून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तासंतास उलटून गेल्या नंतर कोणताही उपचार न झाल्याने त्याला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले हा भोंगळ कारभार बालकाच्या जिवावर बेतल्यास याला शासकीय अनास्था जबाबदार राहील

– वाल्मिक मोगल माजी उपसरपंच लखमापुर.

- Advertisment -

ताज्या बातम्या