शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

सुपा | वार्ताहार

पारनेर तालुक्यातील रांजनगाव मशीद येथे शाळा बंद असल्यामुळे मुले शेततळ्यावर पोहायला गेले. शेततळे मोठे असल्यामुळे पाण्याचा आंदाज न आल्याने इयत्ता सहावीच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राहूल रामदास जवक (वय१३) असे या मुलाचे नाव आहे. त्यास वाचवण्यासाठी गेलेला भाऊ ऋतिक सतिश जवक याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघा भावांना बाहेर काढले यात राहूल वाचू शकला नाही तर ऋतिक यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे शेततळे खोल असून त्यातून बाहेर निघताना घसरुन तळाला गेल्याने मृत्यू झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे.

शाळा बंद आसल्याने मुले दिवसभर भटकतअसतात. पाऊस थांबल्याने कुटुंबातील व्यक्ती आता शेतीच्या कामात व्यस्त झाले असताना मुले आई वडीलाचा डोळा चुकवून पोहायला जाणे. कुठेतरी आडचणीच्या ठिकाणी भटकने किंवा वहान पळवने असले प्रकार करतात व त्यातुन अपघात घडत आहेत. शाळा बंद असल्याने मुलाना सांभाळावे कि कामधंदा पहावा अशा आडचणीत सध्या पालक वर्ग सापडला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *