Friday, April 26, 2024
Homeधुळेमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शनिवारी दोंडाईच्यात

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शनिवारी दोंडाईच्यात

दोंडाईचा ।Dondaicha प्रतिनिधी

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी 30 जुलै रोजी दोंडाईचा येथे येणार (will come here) आहेत. उदयोगपती सरकारसाहेब रावल (Industrialist Sarkarsaheb Rawal) यांच्या अमृत महोत्सवाचे (Amrit Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

यानिमीत्ताने नागरी सत्कार, शेतकरी मेळावा, स्वो.वि.संस्थेला 100 वर्ष पुर्ण झाल्याने कृषी महाविद्यालयाच्या इमारतीसह बहुउउदेशीय संकुलाचे लोकार्पण, दादासाहेब रावल उदयोग समुहालास 50 वर्ष पूर्ण झाल्याबददल त्याठिकाणी नविन ग्लुकोज प्रकल्पाच्या इमारतीचे उदघाटन यासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त अमरावती आणि भोगावती नदीच्या संगमावर 75 फुटी ध्वजस्तंभाचे उदघाटन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या संकल्पनेने निर्माण होणार्‍या सहकारमहर्षी दादासाहेब रावल सह.सुतगिरणीचे ई भूमीपूजनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेंशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, खा.डॉ.सुभाष भामरे, खा.डॉ.हिना गावित, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ.गुलाबराव पाटील, आ.दादा भुसे, आ.जयकुमार रावल , आ.अमरिषभाई पटेल, आ.काशिराम पावरा, आ.राजेश पाडवी, आ.विजयकुमार गावित, आ.मंजुळा गावित, माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुमबाई निकम, पं.स.च्या सभापती अनिता पवार, उपसभापती राजेश् पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहतील.

दरम्यान, सुरवातीला मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. त्यानंतर रावल उद्योग समुहाच्या सुवर्ण महोंत्सवानिमीत्ताने तयार करण्यात आलेल्या नविन ग्लुकोज प्लाँटच्या इमारतीचे लोकार्पण, त्यानंतर महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला अभिवादन, दोंडाईचाचे शेवटचे राजे श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात येवून त्याठिकाणी सहकारमहर्षी दादासाहेब रावल सह.सुतगिरणीचे ई भूमिपूजन करतील, तसेच शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील, त्यानंतर स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने 75 फुटी ध्वजस्तंभाचे उदघाटन होईल. तेथून रावल गढीला भेट देतील, असा त्यांचा कार्यक्रम असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या