सरन्यायाधीशपदासाठी रमण यांच्या नावाची शिफारस

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्या उत्तराधिकारीचे नाव निश्चित केले आहे. यामुळे आता नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल २०२१ रोजी पुर्ण होत आहे. यामुळे केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आले होते. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. सध्या शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. यामुळे रमण यांचे नाव पुढील सरन्यायाधीश म्हणून जवळपास निश्चित मानले जात आहे. ते २६ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

रमण हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातून आले आहेत. जून २००० मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून रुजू झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *