अतिक्रमित जागेतील घरकुले रद्द करण्यात येऊ नये

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुकास्तरीय शक्ती प्रदत्त समितीची बैठक घेऊन त्यात लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन अतिक्रमित जागेबाबत निर्णय घ्यावा. तसेच प्राप्त लाभार्थ्यांपैकी कोणत्याही भूमिहीन शेतमजुरांचे गरिबांचे घरकुल रद्द करण्यात येऊ नये, अन्यथा लाभार्थ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रांताधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील घरकुलाच्या व यादीत नाव असलेल्या बांधकामासाठी जागा नसल्यास शासकीय जागेवर निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण नियमाकुल करून तालुकास्तरीय शक्ती प्रदर्शक समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्राप्त घरकुल धारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

त्या प्राप्त लाभार्थ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत घरकुल बांधण्यासाठी सहकार्य होण्याऐवजी त्यांना वेगवेगळ्या प्रकरच्या नोटीसा देऊन शासकीय जागा अतिक्रमित असल्याने घरकुल रद्द करण्याच्या पत्राचा संदर्भ देत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ब वर्गातील प्राप्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरकुल बांधकाम सुरू करण्यापासून आजपर्यंत वंचित ठेवल्याचे आढळून येत आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचा आहे.

सदर प्राप्त यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमित जागेवर घरकुल द्यावीत, उर्वरित जागाही त्यांना उदरनिर्वाहाचे साधनासाठी असल्याने त्या नियमाकुल करण्यात यावीत, असा निर्णय तालुकास्तरीय शक्ती प्रदत्त समितीची बैठक घेऊन करावा, बैठकीला प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत निर्णय घ्यावा तसेच प्राप्त लाभार्थ्यांपैकी कोणत्याही भूमिहीन शेतमजुरांचे गरिबांचे घरकुल रद्द करण्यात येऊ नये, असे निवेदनात म्ैटले आहे.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पठारे, शहराध्यक्ष शरद बोंबले, गोरख शेजुळ, सचिन गवळी, लक्ष्मण कसबे आदींची नावे आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *