Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याछत्रपती संभाजीराजे स्थापणार 'स्वराज्य' संघटना; निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

छत्रपती संभाजीराजे स्थापणार ‘स्वराज्य’ संघटना; निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

पुणे | Pune

मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. जिथे अन्याय होती तिथे लढा देण्यासाठी मी उभा राहील. आम्ही सर्व एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचे नाव ‘स्वराज्य’ (Swarajya) आहे, अशी घोषणा छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांनी केली…

- Advertisement -

गेली अनेक वर्ष मी समाजाच्या हितासाठी लढत आहे. काही वर्ष मला खासदारकी मिळाली. त्यात अनेक कामे करता आली. समाजासाठी कामे करायची असतील तर सत्ता महत्वाची असते. म्हणून मी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक मी अपक्ष लढविणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे…

स्टंटबाजी सोडा अन् लोकांच्या प्रश्नांवर बोला; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

स्वराज्य संघटना (Swarajya Sanghatana) पुढे राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. हा पहिला टप्पा आहे. असे म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यभरात मी जे दौरे केले त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा विचार पोहोचविण्याची संधी मिळाली. गेल्या २० वर्षात शेतकरी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, विद्यार्थी असे अनेक प्रश्न समोर आले. त्यावेळी काही घेतलेले निर्णय यामुळे लोकांचे प्रेम मला मिळाले.

Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्…

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सांगितले. त्यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदारकी दिली. लोक कल्याणासाठी ते पद स्वीकारले. मी राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या