Friday, April 26, 2024
Homeनाशिकसोमवारी खासदार संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर

सोमवारी खासदार संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी

सकल मराठा क्रांती मोर्चाचे येत्या सोमवारी (दि २१) रोजी नाशिक मध्ये आंदोलन होणार आहे. संभाजी राजे यांच्या उपस्थितीत हे मूक आंदोलन होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे….

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मुखातून मराठा समाज बांधवांच्या भावनांना वदवून घेण्यासाठी खा संभाजीराजे दाखल होणार आहे.

याबाबतच्या नियोजनाची बैठक उद्या (दि १८) जून रोजी दुपारी औरंगाबाद रोड येथील एका मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

या आंदोलनासाठी नाशिक शहरातील तीन मंत्री, खासदार, आमदार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. खासदार उदयनराजे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आल्याचे समजते.

आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली तरीदेखील आंदोलन करण्यावर मराठा समाजबांधव ठाम असल्याची घोषणा आज मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिली असल्याने आंदोलनाकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या