Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठन व प्रार्थना करावी – छगन भुजबळ

मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठन व प्रार्थना करावी – छगन भुजबळ

‘रमजान’निमित्त छगन भुजबळ यांनी मुस्लीम बांधवांना दिल्या शुभेच्छा

नाशिक | रमजान महिन्यानिमित्त राज्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लिम बांधवांसह सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लढाईत यशस्वी होण्यासाठी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. मात्र जगभरात आणि देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरु आहे. दुर्दैवाने यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत असून हजारो लाखो लोक यामुळे आजारी पडत आहे.

अशाप्रसंगी हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून एकच उपाय आहे तो म्हणजे गर्दी नकरणे, एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम करणे या माध्यमातूनच त्याच्यावर आळा घातला जाऊ शकतो. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज पठन व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येऊन जर धार्मिक कार्यक्रम केले तर धोकाही निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे आपण बाहेर न पडता आपल्या घरातच राहून नमाज पठण व प्रार्थना करावी. त्यामुळे स्वतः सोबतच इतरांनाही याचा फायदा होईल.तसेच धर्मगुरूनी देखील रमजान महिन्यात घरात राहून नमाज पठाण करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

रमजानच्या कामात प्रशासनाच्या वतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. रमजानच्या काळात फळांची तसेच अत्यावश्यक साहित्याची दुकाने वेळेत उघडतील याठिकाणी देखील सर्व बांधवांनी गर्दी न करता अंतर पाळूनच खरेदी करावी. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण यश मिळवू शकतो. यासाठी पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये आपण घरात राहूनच नमाज पठन व प्रार्थना करूया असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या