Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथांना घेऊन पळाले'

‘पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथांना घेऊन पळाले’

मुंबई । Mumbai

‘पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथांना घेऊन पळाले’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या नेत्यांची बैठक बोलविली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधतांना ही प्रतिक्रिया दिली…

- Advertisement -

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) लक्ष ठेवून आहेत. तसेच ‘शिवसेनेची अस्वस्थता त्यांच्या बंडखोर आमदारांनी (mla) बोलून दाखवली आहे. याआधी आमच्या कानावर असे काही आले नव्हते? तो शिवसेनेचा (shivsena) अंतर्गत प्रश्न आहे. सरकार पडणे, राजीनामा देणे वैगरे आम्हाला नवीन नाही. राष्ट्रवादी कधीही निवडणुकांसाठी तयार आहे’ असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊतांनी (Sanjay Raut) विधानसभा (Assembly) बरखास्तीबाबत केलेल्या ट्वीट संदर्भात भुजबळांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मी अद्याप संजय राऊतांचे ते ट्वीट पाहिलेले नसून आता शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहोत. त्यानंतर काही मार्ग निघतो का यावर चर्चा करु, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या