IND vs SL : कसोटी मालिकेतून पुजारा-रहाणेला डच्चू; रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

भारतीय कसोटी संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात कसोटी कर्णधार मिळाला आहे. त्यामुळे आता वनडे (ODI), कसोटी (Test) आणि टी २० (T 20) संघाच्या कर्णधार पदासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विंडीजविरुद्धची (West Indies) मालिका आटोपल्यांनंतर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे…

कसोटी सामने बंगळूर (Bangalore) आणि मोहाली (Mohali) येथे होणार आहेत. तर मोहाली येथे होणारी पहिली कसोटी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) १०० वी कसोटी असणार आहे. तर बंगळूर येथे होणारा दुसरा सामना दिवसरात्र होणार आहे.

टी २० सामने लखनौ (Lucknow) आणि धरमशाला (dharamshala) येथे होतील. हे सामने २४,२६, २७ फेब्रुवारी रोजी होतील. कसोटी संघातून ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना आराम देण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह याची संघाच्या उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतीय टी २० संघ

रोहित शर्मा, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक चाहर, व्यंकटेश अय्यर, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन, मोहंमद सिराज, आवेश खान, युझवेन्द्र चहल, रविंद्र जडेजा, रवी बिष्णोई, कुलदीप यादव.

कसोटी संघ

रोहित शर्मा, मयंक अगरवाल, विराट कोहली, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत, के. एस. भरत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहंमद शमी, सौरभ कुमार, उमेश यादव आणि मोहंमद सिराज.

सलिल परांजपे, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *