Thursday, April 25, 2024
Homeनगरउसने पैशापोटीच्या धनादेशाचा अनादर

उसने पैशापोटीच्या धनादेशाचा अनादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतीच्या सुधारणेसाठी दिलेल्या रक्कमेच्या परतफेडीसाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याने राजकुमार विक्रम कणसे (रा. कोकणगाव, ता. कर्जत) यास चार महिने साधी कैद आणि भरपाईपोटी चार लाख रूपये देण्याचा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नाईकवाडी यांनी दिला.

- Advertisement -

विलास हरिश्चंद्र झांबरे यांनी गावातील रहिवाशी राजकुमार कणसे यांना शेतीच्या सुधारणेसाठी 2018 मध्ये तीन लाख रूपये हात उसने दिले होते. याबाबत नोटरी समोर करारनामा ही केला होता. ही रक्कम सहा महिन्यात परत देण्याचे ठरले होते. कणसे यांनी ही रक्कम मुदतीत परत दिली नाही. हात उसने रक्कमेची मागणी केल्याने कणसे यांनी नगर अर्बन बँकेच्या कर्जत शाखेचा धनादेश दिला.

बँक खात्यात पुरेशी रक्क्म शिल्लक नसल्याने धनादेशाचा अनादर झाला. कायदेशीर नोटिस पाठवून ही त्यांनी रक्कम न दिल्याने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. धैर्यशील वाडेकर, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड. अतिश निंबाळकर यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या