Thursday, April 25, 2024
Homeनगरधनादेश न वटल्यामुळे कर्जदाराला शिक्षा

धनादेश न वटल्यामुळे कर्जदाराला शिक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेला कर्जदाराने दिलेला चेक न वाटल्याने एकास 3 महिन्यांची शिक्षा अहमदनगर जिल्हा व

- Advertisement -

सत्र न्यायालयाने सुनावली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एम.उन्हाळे यांनी हा निर्णय दिला आहे. राजेंद्र मधुकर लटके रा.भुषणनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

2017 रोजी राजेंद्र लटके यांनी डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेकडून 50 हजाराचे कर्ज घेतले होते. वारंवार पैशाची मागणी करून देखील कर्जदाराकडे थकबाकी वाढत होती. त्यानंतर संबधित कर्जदाराने पतसंस्थेला 51 हजार 211 रूपयांचा चेक दिला आहे.

मात्र हा चेक वटला नाही. याबाबत पतसंस्थेने संबधित कर्जदार राजेंद्र मधुकर लटके यांना नोटीस पाठवत तातडीने 15 दिवसात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर वसुली अधिकारी सचिन प्रभाकर साळवे यांनी अहमदनगर न्यायलयात अर्ज दाखल केला.

याबाबत अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पी.एम.उन्हाळे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. आरोपी राजेंद्र मधुकर लटके यास 3 महिन्यांची साधी कैद व नुकसान भरपाई म्हणून 77 हजार 100 रूपये सदर पतसंस्थेला देण्याचा निर्णय दिला.

नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपी यांने आणखी 3 महिने साधा करावासाची शिक्षा सुनावली, अशी माहिती अ‍ॅड.किशोर वैद्य यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या