Friday, April 26, 2024
Homeनगरधनादेश न वटल्याने आरोपीस सहा महिने कैद व पावणेतीन लाखाचा दंड

धनादेश न वटल्याने आरोपीस सहा महिने कैद व पावणेतीन लाखाचा दंड

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

धनादेश न वाटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस सहा महिने कारावास तसेच पावणेतीन लाख रुपयांचा दंड व नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील मियासाहेब पतसंस्थेने सुरेश दामोदर डावखर रा. राहुरी यांना दीड लाख रुपयाचे कर्ज दिले होते मात्र कर्जदाराने लिहून दिल्याप्रमाणे व कागदपत्राप्रमाणे नियमित कर्जाचे हप्ते भरले नाहीत त्यामुळे थकबाकी झाली. म्हणून मियासाहेब पतसंस्थेने थकबाकी वरून रकमेची मागणी केली. तेव्हा सुरेश डावखर यांनी एक लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु आरोपीच्या खात्यात रक्कम शिल्लक नाही म्हणून धनादेश वटला नाही. सुरेश डावखर याने खात्यात रक्कम शिल्लक नाही हे माहित असूनही फसवण्याच्या उद्देशाने धनादेश दिला.

सुरेश डावखर यास प्रथम कायदेशीर नोटीस दिली व नंतर राहुरी न्यायालयात एसएससी नंबर 816/ 2017 फिर्याद दाखल केली सदर केस चे न्यायालयात गुणदोषावर चौकशी झाली. जाबजबाब झाले. मियासाहेब पतसंस्थेने आवश्यक ती कागदपत्रे कोर्टात दाखल केली व आरोपीने फसवण्याच्या उद्देशाने धनादेश कसा दिला? याबाबत संस्थेचे वकील यांनी युक्तिवाद केला व सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून आलेल्या पुराव्यावरून कलम 138 नुसार दोषी धरण्यात आले. आरोपी सुरेश दामोदर डावखर यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा व दोन लाख 75 हजार रुपये दंड केला सदर दंडाची रक्कम मियासाहेब संस्थेला देण्याचा हुकूम केला मियासाहेब पतसंस्थेच्या वतीने अ‍ॅड. डी. आर. तोडमल यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या