Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : आज चेन्नई-पंजाब आमनेसामने

IPL 2022 : आज चेन्नई-पंजाब आमनेसामने

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज रविवारी दोन डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघांमध्ये सायंकाळी ७:३० वाजता मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर (Brabourne Crickey Stadium Mumbai) होणार आहे. पंजाब किंग्ज संघाने २ सामन्यांमध्ये १ विजय आणि १ पराभव स्वीकारला आहे…

- Advertisement -

सध्या त्यांच्या ताफ्यात २ गुण आहेत. पंजाबने पहिल्या सामन्यात बंगळूर संघांवर (RCB) विजय मिळवून दणक्यात सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात केकेआरने (KKR) पंजबाला पराभूत करून पंजाबचा विजयीरथ रोखला. आता चेन्नईवर मात करून विजयी लय परत मिळवण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज झाले आहेत.

पंजाबकिंग्ज संघाकडे अनेक पॉवर हिटर्स आहेत. शिखर धवन, मयंक अगरवाल या मधल्या फळीतील युवा फलंदाजांकडून शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्याकडून संघाला मोठी खेळी अपेक्षित आहे.

तर दुसरीकडे डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला सलामी दोन्ही सामन्यांमध्ये पराभव टाळण्यात अपयश आले होते. आता आयपीएलमधील (IPL) आपली पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी चेन्नई आज मैदानात उतरणार आहे.

सलामी सामन्यात केकेआरविरुद्ध चेन्नई संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात धोनी वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या सामन्यात लखनौविरुद्ध २०० पेक्षा अधिक धावसंख्या फलकावर लावूनदेखील दवामुळे चेन्नईचे सर्व गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरले.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या