Friday, April 26, 2024
Homeक्रीडाIPL 2021 Final : चेन्नई की कोलकाता?; कोण साजरी करणार विजयादशमी

IPL 2021 Final : चेन्नई की कोलकाता?; कोण साजरी करणार विजयादशमी

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ चा (ipl 2021) अंतिम सामना आज शुक्रवारी ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) आणि २ वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) या दोन संघांमध्ये दुबई आतंरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. आयपीएल २०२१ च्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये चेन्नईने (csk) कोलकाताला (kkr) नमवले आहे.

आयपीएल २०१२ च्या अंतिम सामन्यात कोलकाताने चेन्नईला हरवले होते. आयपीएल २०२१ च्या भारतातील हंगामात कोलकाताने ७ पैकी २ विजय आणि ५ पराभव पत्करून सातव्या स्थानी आपले स्थान निश्चित केले होते.

मात्र आयपीएल यूएईत (UAE) परतल्यानंतर कोलकाता संघाचा खेळ कमालीचा उंचावला आहे. त्यांनी ९ पैकी ७ सामन्यात विजय आणि २ पराभवांसह थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

मात्र कोलकाता आणि चेन्नई आतापर्यंत २५ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात चेन्नईचे पारडे कोलकातावर जड राहिले आहे. चेन्नईने १७ तर कोलकाताने ८ सामने जिंकले आहेत. मागील ५ सामन्यांपैकी चेन्नईने ४ तर कोलकाताला १ विजय मिळवता आला आहे.

कोलकाताची उजवी बाजू

आयपीएल २०२१ च्या पहिल्या हाफमध्ये सपाटून मार खाल्ल्यावर कर्णधार ऑईन मॉर्गनने संघातील युवा भारतीय खेळाडूंवर दाखवलेला विश्वास हा विश्वास सार्थ ठरवत कोलकाता संघाच्या सर्व खेळाडूंनी मागील ९ सामन्यांमध्ये केलेले सातत्यपूर्ण प्रदर्शन होय. त्यामुळे संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे.

चेन्नईची ताकद

दुसरीकडे महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड त्याने यंदाच्या हंगामात फाटकावलेल्या ६०० पेक्षा अधिक धावा तसेच मोक्याच्या क्षणी संघाला विकेट्स मिळवून देण्यात पालघरच्या शार्दूल ठाकूरने दिलेले महत्वपूर्ण योगदान तसेच संघात असलेले अनुभवी मातब्बर आणि सामन्याचे चित्र क्षणार्धात एकहाती फिरवू शकणारे खेळाडू ही चेन्नईची ताकद आहे.

कदाचित चेन्नई संघाचा कर्णधार धोनी आयपीएल विजेतेपद पटकावून धोनीला विजेतेपदाची सदिच्छा भेट मिळवून देण्यात सर्व खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील यात काही शंका नाही. शिवाय दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांमध्ये आजचा सामना होणार असल्यामुळे सामना अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या