Friday, April 26, 2024
Homeक्रीडासलामीच्या सामन्यात चेन्नईचा मुंबईला दणका

सलामीच्या सामन्यात चेन्नईचा मुंबईला दणका

अबुधाबी । वृत्तसंस्था

सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर 5 गडी राखून विजय मिळवला. 2018पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणार्‍या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला 163 धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (71) आणि फाफडु प्लेसिस (नाबाद 58) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

- Advertisement -

सलामीची जोडी चेन्नईची चांगलीच धुलाई करणार असे वाटत असतानाच धोनीने चेंडू पियुष चावलाच्या हाती चेंडू दिला. त्याने कर्णधार रोहितला 12 धावांवर मागे धाडले. त्यानंतर पुढच्याच षटकात सॅम कुरनने 20 चेंडूत 33 धावा करणार्‍या स्फोटक फलंदाज क्विंटन डिकॉकला बाद करत मुंबईला पाठोपाठ दुसरा धक्का दिला. त्यामुळे चेन्नई सामन्यात पुनरागमन केले असे वाटले. परंतु त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी यांनी मुंबईची पडझड रोखली आणि धावफलक हालता ठेवला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 44 धावांची भागिदारी रचत मुंबईला 11 षटकात 90 च्या पार पोहचवले.

ही जोडी डोकेदुखी ठरत असतानाच धोनीने पुन्हा दिपक चाहरकडे चेंडू सोपवला. त्याने पहिल्या स्पेलमधे केलेल्या चुकांची सुधारणा करत सुर्यकुमारच्या रुपात चेन्नईला तिसरी विकेट मिळवून दिली. दरम्यान, सेट झालेल्या सौरभ तिवारीनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 31 चेंडूत 42 धावांपर्यंत मजल मारली होती. तो आपले अर्धशतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच जडेजाला षटकार मारण्याच्या नादात डुप्लिसिसकडे झेल देऊन माघारी परतला.

163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन 5 धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने अवघ्या एका धावेवर त्याला बाद केले. शेन वॉटसन (5) आणि मुरली विजय (1) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफडु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत 33 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. अतिशय भक्कम अशी डु प्लेसिस-रायडू यांची भागीदारी अखेर राहुल चहरने तोडली. रायडू 71 धावांवर झेलबाद झाला. जाडेजाही 10 धावांत बाद झाला.

त्यानंतर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद 58 धावा केल्या.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण पॉवरप्लेचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात रोहित (12) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही माघारी परतला. 5 चौकारांसह त्याने 20 चेंडूत 33 धावा केल्या. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो 17 धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील 31 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्याने केवळ 14 धावा केल्या. कृणाल पांड्याही 3 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता असलेला पोलार्ड 18 धावांवर माघारी गेला. नंतर पॅटिन्सनदेखील 11 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 9 बाद 162 धावांपर्यंतच मजल मारता आली.

मुंबईचा अंतिम 11 चा संघ– रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सुर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पॅटिसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नईचा अंतिम 11 चा संघ– मुरली विजय, शेन वॉट्सन, फाफ डुप्लसीस, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, सॅम कुरन दिपक चाहर, पियुष चावला, लुनगी एनगिडी

एकही प्रेक्षक नाही, तरीही प्रेक्षकांचा जल्लोष!

अबुधाबी : आयपीएल 2020 मधील पहिला सामना अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. प्रथमच स्टेडियममध्ये चाहते उपस्थित नाहीत. परंतु तरीही तो अनुभव येत नाही. वास्तविक, आयपीएलचे प्रसारण भागीदार असलेल्या हॉटस्टारने एक अनोखा प्रयोग केला आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये असल्याची भावना देत हॉटस्टारवरील थेट सामन्यावेळी गर्दीचा कृत्रिम आवाज जोडला गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या