धनादेश अनादरीत केसप्रकरणी 1 लाख 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

jalgaon-digital
1 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

धनादेश अनादरीत केस प्रकरणी एक लाख दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश संगमनेर येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, मे. साई सेवा ट्रॅक्टर्स बाभळेश्वर यांनी विठ्ठल तान्हाजी गागरे, रा. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांना रक्कम रुपये 73,500/- चे रोटा वेटर विक्री केले होते. सदर रोटा वेटरच्या खरेदी पोटी विठ्ठल तान्हाजी गागरे यांनी रक्कम रुपये 73,500/- चा चेक मे. साई सेवा ट्रॅक्टर्स बाभळेश्वर यांना दिला होता. परंतू, सदरचा चेक विठ्ठल तान्हाजी गागरे यांचे खात्यावर चेक वटण्याइतकी रक्कम शिल्लक नसल्याने सदरचा चेक अनादरित झाला. त्यामुळे श्री साई सेवा ट्रॅक्टर्स बाभळेश्वर चे प्रो.प्रा. सुभाष नारायण नाईकवाडे यांनी संगमनेर येथील अति महानगर दंडाधिकारी यांच्या कोर्टात चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 प्रमाणे विठ्ठल तान्हाजी गागरे विरुद्ध केस दाखल केली.

सदर केसमध्ये मे. न्यायालयाने मे. साई सेवा ट्रॅक्टर्स बाभळेश्वर यांनी दिलेला पुरावा ग्राह्य धरून मे. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी जे. व्ही. पेखले पुरकर मॅडम यांनी आरोपी विठ्ठल तानाजी गागरे यांना दोषी धरून चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 अन्वये श्री साई सेवा ट्रॅक्टर्स बाभळेश्वर यांना रक्कम रुपये 1,10,000/- नुकसान भरपाई पंधरा दिवसांच्या आत देण्याचा तसेच सदरची नुकसान भरपाई पंधरा दिवसांच्या आत न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा भोगण्याचा आदेश मे. न्यायालयाने दिलेला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *