Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसचा जलवा! हिमाचल प्रदेशमध्ये २९ जागांवर विजयी

काँग्रेसचा जलवा! हिमाचल प्रदेशमध्ये २९ जागांवर विजयी

हिमाचल प्रदेश : काँग्रेस पक्ष विजयाच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण २९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. बहुमताच आकडा पार करण्यासाठी काँग्रेसला आणखी ६ जागांवर विजय आवश्यक आहे. काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये १० जागांवर आघाडीवर आहे. भाजपचा आतापर्यंत १६ जागांवर विजय झाला आहे. भाजप सध्या १० जागांवर आघाडीवर आहे.आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा पराभवगृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी 1 लाख 16 हजार मतांनी विजय मिळवला आहे.लिम्बायत मतदारसंघात भाजप उमदेवार 50 हजार मतांनी आघाडीवर आहे. सूरत शहरात भाजपाने 11 जागा जिंकल्या आहेत. गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली, त्यामुळे जेनतेने भाजपाला भरघोस मतदान केले. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचे त्यांचे राजकारण सोयीनुसार चालत असते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये एक इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटले होते. ते निकालातून दिसले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.भुपेंद्र पटेलच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथहिमाचल प्रदेश : काँग्रेस 40 तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. इतर तीन जागांवर पुढे आहेत. काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची फळी शिमलात दाखल झाली आहे. विजयी आमदारांना मोहालीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये ठेवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.गुजरात निकाल : भाजप ९३, काँग्रेस ०६, आप ०३हिमाचल प्रदेश : काँग्रेस ३० तर भाजपने १७ जागांवर विजय मिळवला आहे.गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनमुळे भाजपचा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजपवर विश्वास टाकल्याबद्दल मला राज्याच्या जनतेचे आभार मानायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करु असे आश्वासन आम्ही देतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपचा ५० जागांवर विजय झाला आहे. विरामगाम विधानसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल विजयी.हिमाचल प्रदेश : हमीरपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार आशिष शर्मा यांचा विजय झाला आहे. आशिष शर्मा यांचा 13 हजार 051 मतांनी विजय मिळवला आहे.भरुचमधून भाजपा उमेदवार रमेश मिस्त्री विजयी.

अंकलेश्वरमधून भाजपा उमेदवार ईश्वर पटेल विजयी.

- Advertisement -

नवसारी येथे भाजपा उमेदवार राकेशभाई देसाई विजयी

साबरमतीमधून भाजपा उमेदवार हर्षद पटेल विजयी.

अहमदाबादच्या असरवा येथे भाजपा उमेदवार दर्शना वाघेला विजयी.गुजरात : थोड्याच वेळात भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. जामनगरमधून रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा यांचा विजय झाला आहे.गुजरातमध्ये भाजपचा ३० जागांवर विजय झाला आहे.हिमाचल प्रदेशात काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना दुसरीकडे नेण्याची तयारी करत आहे. विजयी आमदारांना काँग्रेस हिमाचलमधून दुसऱ्या राज्यात हलवू शकतो. काठावर आकडे असल्याने घोडेबाजाराच्या भीतीने काँग्रेस हे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचे अभिनंदन केले आहे. सी आर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने गुजरातमधील निवडणूक लढली आहे. भाजपने गुजरातमध्ये विक्रमी जागांवर आघाडी मिळवली आहे.अमित शाह गुजरातमध्ये दाखल. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिमल्यात दाखल.भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा भाजपाकडून निवडणूक लढवत असून सध्या आघाडीवर आहे. भाजपने रिवाबाला जामनगरमधून उमेदवारी दिली असून त्या १८ हजार ९८१ मतांनी आघाडीवर आहे.गुजरातमध्ये आपला १३ टक्क्याहून अधिक जास्त मत मिळाली आहेत. त्यामुळे गुजराती मतदारांनी आपला पसंती दिल्याचे दिसून येते. आता आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.हिमाचल प्रदेश : अटीतटीच्या लढतीमुळे प्रभारी विनोद तावडे शिमल्यात दाखल. काठावर आकडे असल्याने सत्ता स्थापनेबाबत सर्व शक्यतांची पडताळणी हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 जागांचे निकाल हाती लागले आहे. त्यापैकी भाजपने 4 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.हिमाचलमध्ये ६ जागांचे निकाल जाहीरभाजपने राजकारण करत जे धोरण अवलंबले जात आहे. त्याचे उदाहरण गुजरातमध्ये दिसून येत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा कौल त्यांच्या बाजूने आहे, मात्र दबावतंत्र आणि भीतीच्या माध्यमातून हे सर्व झाले असल्याचा आरोप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.गुजरात निवडणूक : कॉंग्रेसने उघडलं विजयाचं खातं  दि. 11 किंवा 12 डिसेंबरला गुजरातमध्ये शपथविधी होणार असल्याचे समजत आहे.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी झाले आहेत. घटलोडियामधून भूपेंद्र पटेल यांनी विजय मिळवला आहे.हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ३६ जागांवर, भाजपा २८ जागांवर आणि इतर ३ जागांवर पुढेहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा सेराज मतदासंघातून विजयहिमाचल प्रदेश : तीन जागांवर अपक्ष आमदार सरस ठरत असल्याचे दिसून येते.गुजरातमध्ये दुहेरी आकडा टिकवताना काँग्रेसची दमछाक होताना दिसून येत आहे.गुजरात निकाल : भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे.गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. गांधीनगरमधील महिला भाजप कार्यकर्त्यांनी नाचत आनंद साजरा केला आहे.गुजरात : आम आदमी पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहे.हिमाचल प्रदेश : भाजपला 34 जागा तर काँग्रेसला 31 जागांवर आघाडी तर इतरांना 3 जागा. 68 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.गांधीनगर दक्षिणमधून भाजपचे अल्पेश ठाकोर ३,५०० हून अधिक मतांनी आघाडीवरगुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता गुजरातमधील भाजप कार्यालयात जाणार.  विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांची घेणार भेट असल्याची माहिती मिळत आहे.गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला धोबीपछाडगुजरातचा पहिला निकाल हाती : नवसारीमध्ये भाजपचे पियुष पटेल विजयीपंतप्रधान नरेंद मोदींनी भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश कऱण्याचा प्रयत्न केला आहे. जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. सरकार आणि संघटनेने केलेल्या कामामुळे हा मोठा विजय मिळाला आहे. मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.गुजरात : भाजप ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. आपने दिल्ली घेतली आणि गुजरात भाजपासाठी सोडलं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.काँग्रेसमधून भाजपात प्रवेश कऱणारे हार्दिक पटेल सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते लखाभाई भारवाड पिछाडीवर आहेत.हिमाचल प्रदेशमध्ये सर्व ६८ जागांचे प्राथमिक अंदाज समोर आले आहेत. येथील एकूण ६८ जागांपैकी भाजपा ३३ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस ३२ जागांवर पुढे आहे. येथे अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.ताज्या अपडेट्ससाठी रिफ्रेश करत राहा… गुजरात : भाजपा १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. भाजपा काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या ३२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे.

एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपाच्या हाती येतील. भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

पण काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडणं त्यांना शक्य होणार नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसला ही मतं मिळाली होती.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज (८ डिसेंबर) मतमोजणी होत असून लवकरच येथे कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या