Wednesday, April 24, 2024
Homeनगरचावडी-द्वारकामाई जवळील रस्ता व्यावसायीकांसाठी खुला

चावडी-द्वारकामाई जवळील रस्ता व्यावसायीकांसाठी खुला

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीतील व्यावसायिक व ग्रामस्थांना दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरला जाणारा साई मंदिरालगतचा

- Advertisement -

चावडी, द्वारकामाई रस्ता खुला करण्याच्या दृष्टीने साई संस्थान प्रशासन व नगरपंचायतचे पदाधिकारी यांचा सोमवारी सकाळी पाहणी दौरा झाला असून शिर्डी कार्यालयाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या बैठकीनंतरच सदरील रस्ता शासनाच्या अटीशर्तीचे नियम पाळून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्यावतीने नगरसेवक सुजित गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील बहुतेक रस्ते व व्यापारी पेठा बंद करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर शासनाने हळूहळू ही बंदी सैल करण्यास सुरुवात केली होती. त्यात चावडी, द्वारकामाई जवळून जाणारा रस्ता प्रशासनाने काही दिवस बंद ठेवला होता. त्यानंतर काल सोमवारी दुपारच्या सुमारास पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन व नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडून या परिसराची पाहणी करण्यात आली.

यावेळी सकारात्मक चर्चेत हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच साई कॉम्लेक्स व परिसरातील व्यावसायिक आपले व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होणार असल्याने या सकारत्मक निर्णयाबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. तर व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

याप्रसंगी नगरसेवक शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, सुधीर शिंदे, रवी कोते, शिर्डी पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, मंदिर सुरक्षेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

द्वारकामाई चावडी परिसरातील रस्ता स्थानिक व्यवसायिकांना बॅरीकेटींग बंद असल्यामुळे रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. वॉर्डचा नगरसेवक या जबाबदारीने साईबाबा संस्थान प्रशासन आणि शिर्डी नगरपंचायतचे अधिकारी यांचा समन्वय घडवून रस्ता खुला करण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

– सुजित गोंदकर, नगरसेवक शिर्डी नगरपंचायत

- Advertisment -

ताज्या बातम्या