Saturday, April 27, 2024
Homeनगरपर्युषण महापर्व ऑनलाईन

पर्युषण महापर्व ऑनलाईन

अहमदनगर | प्रतिनिधी

राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदॠषिजी म सा यांचे स्मृती समाधी स्थळ आनंदधाम येथे चातुर्मास निमित्ताने विराजमान पू श्री विमलकंवरजी म सा आदि ठाणा 5 यांच्या सान्निध्यात शनिवार, 4 सप्टेंबरपासून पर्युषण महापर्व प्रारंभ होत आहे. हा कार्यक्रम यावेळी ऑनलाईन प्रसारित होणार आहे.

- Advertisement -

जैन धर्मियांचा चातुर्मास पर्वातील पुण्यार्जन अर्जित करण्याचा अत्यंत प्रभावित क्षण पर्युषण महापर्व या कालावधीत धर्म साधना आराधना जप तप दान करण्याचे विशेष महत्व आहे. 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दररोज सकाळी 8.30 ते 9.30 अंतगढ सुत्र वांचना, 9.30 ते 10.30 प्रवचन, दुपारी 2.30 ते 3.30 कल्पसूत्र वांचना व सायंकाळी सुर्यास्ता नंतर प्रतिक्रमण होईल. 11 सप्टेंबर रोजी प्रवचना नंतर दुपारी 12 वाजता सामूहिक आलोयना व मंगलपाठ होईल 12 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सामूहिक क्षमापना कार्यक्रम होईल, अशी माहिती श्रावक संघाच्या वतीने देण्यात आली.

सार्वजनिक, धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी रुग्ण वाढीचे मुख्य कारण ठरत असल्याने स्थानीय प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार प्रवचन स्थळी फक्त 50 व्यक्तिंना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. चातुर्मास निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम ऑनलाईन युट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम ऑनलाईन होतील. या कालावधीत आनंदधाम, धार्मिक परिक्षा बोर्डचे सर्व गेट बंद राहतील, याची सर्व धर्म प्रेमी बंधू भगिनींनी नोंद घ्यावी. कोरोना संसर्ग भयावह असल्याने आयोजित धार्मिक कार्यक्रमात गर्दी न करता ऑनलाईन सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या