Thursday, April 25, 2024
Homeनगरचासनळी- देवळालीच्या घटनेची डॉ. लाळगे करणार चौकशी

चासनळी- देवळालीच्या घटनेची डॉ. लाळगे करणार चौकशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर झालेल्या महिलेच्या प्रसृतीच्या घटनेची आणि कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच कडाक्याच्या थंडीत झालेल्या महिलेच्या प्रसृती प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहेत. या चौकशीसाठी जिल्हा परिषदेेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसृती आलेल्या महिलेला दाखल करून न घेता परत पाठविण्यात आले होते. आरोग्य केंद्रा बाहेर गेल्यानंतर काही अंतरावर संबधीत महिलेची प्रसृती झाली होती. आरोग्य केंद्रात दाखल न केल्यामुळे संबंधीत महिलेली केंद्राबाहेर प्रसृती झाली होती. असाच प्रकार सलग दुसर्‍या दिवशी कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. या दोन्ही प्रकरणाची दखल जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतली आहे.

या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे माता बालसंगोपण अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पाच दिवसात दोन्ही घटनांची चौकशी करून आपला अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांना सादर करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या