Wednesday, April 24, 2024
Homeनगरलॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरूद्ध मोक्का (महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली.

लॉरेन्स दोराई स्वामी (रा. भिंगार), संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरूडगाव ता. नगर), विक्रम आनंदा गायकवाड (रा. वाळुंज ता. नगर), बाबा ऊर्फ भाऊसाहेब सोपान आढाव, संदीप परशुराम वाकचौरे, प्रकाश दशरथ भिंगारदिवे, अर्जुन सबाजी ठुबे, बाळासाहेब रमेश भिंगारदिवे यांच्याविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लॉरेन्स स्वामीला या गुन्ह्यात औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केलेला आहे. संदीप शिंदे, संदीप वाघचौरे, प्रकाश भिंगारदिवे, अर्जुन ठुबे यांना अटक करण्यात आली आहे. तर विक्रम गायकवाड, बाबा आढाव, बाळासाहेब भिंगारदिवे हे पसार आहेत.

- Advertisement -

नगर- सोलापूर रोडवरील भिंगार छावणी परीषदेच्या जकात नाकावर काही तरूणांनी धुडगूस घालून कर्मचार्‍यांना मारहाण करीत दरोडा घातला होता. त्यात लॉरेन्स स्वामीसह वरील आरोपींचे नावे निष्पन्न झाली होती. यानंतर भिंगार पोलिसांनी सिनेस्टाईल लॉरेन्स स्वामी याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. लॉरेन्स स्वामीसह अन्य आरोपीविरूद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो प्रस्ताव तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. डॉ. दिघावकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या