Saturday, April 27, 2024
Homeनगरजिल्ह्यातील ‘या’ टोळीविरूद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र

जिल्ह्यातील ‘या’ टोळीविरूद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)

गुंडगिरीमुळे कुप्रसिद्ध आकाश डाके टोळीविरूद्ध मोक्का लावण्यात आले असून विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

तीन राज्यात तब्बल २६ गुन्हे करणारा अट्टल गजाआड

जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीसाठी डाके टोळी कुप्रसिद्ध आहे. हिंसाचार, हिंसाचार करण्याची धमकी, जबरी चोरी, दरोडा, दहशत असे अनेक गुन्हे आकाश डाके व टोळी विरुद्ध तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी या पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.

Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ का म्हणतात?

नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा स्वरूपाचा वाद झाला. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला.

Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

याप्रकरणी पोलिसांनी सचिन निकम यांच्या फिर्यादीवरून गणेश कुऱ्हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, बाळासाहेब वाघमारे आणि दोन विधिसंघर्शित बालकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता. या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईसाठी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.

Photo : ‘ही’ आहेत देशातील TOP 10 सर्वात पॉवरफुल कपल

सदर गुन्ह्यात आकाश डाके टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का अन्वये अपर पोलीस महासंचालकांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या