Friday, April 26, 2024
Homeनगरचांगदेव महाराज मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची अखेर दुरुस्ती

चांगदेव महाराज मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची अखेर दुरुस्ती

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणार्‍या रस्त्याची काल मुरुम टाकून तातडीने दुरुस्ती करण्यात आल्यामुळे भाविक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

येथील रेल्वे फाटकाच्या गेटपासून मंदिराकडे जाणार्‍या रेल्वे कॉलनी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. पाऊस सुरु असल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे सुद्धा पडले होते. रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत दैनिक सार्वमतमध्ये याबाबत नुकतेच वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. अखेर या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली.

सरपंच डॉ. धनजंय धनवटे यांनी पुढाकार घेऊन व प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी थांबून रस्त्यावर मुरुम टाकून दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे आता चांगदेव महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणारा रेल्वे कॉलनी पर्यंतचा रस्ता काही काळ का होईना व्यवस्थित झाला आहे. विशेष म्हणजे येत्या रविवार दिनांक 24 जुलै रोजी आषाढ महिन्यातील कामिका एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पुणतांबा येथे दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत असते.

या यात्रेत अंदाजे 2 लाखापर्यंत भाविक हजेरी लावत असतात. यात्रेपूर्वी मंदिराकडे जाणार्या रसत्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते, असे पुणतांबा ग्रामस्थाचे मत होते. अखेर रस्त्याची दुरुस्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच या प्रश्नाकडे दैनिक सार्वमतने लक्ष वेधल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या