चांदवड बस दुर्घटना : अपघातातील जखमी, मृत व्यक्तींना मदत करणार- भुसे

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील चांदवड जवळील मतेवाडी येथे बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये महिला वाहकाचा जागीच, तर एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

यासंदर्भात नाशिक जिल्हा पालकमंत्री यांनी तात्काळ प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याशी संवाद साधून संपूर्ण मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात तसेच पोलिस निरीक्षक चांदवड यांच्याशी स्वतः पालकमंत्री दादा भुसे संपर्कात असून या संपुर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

जखमींना तसेच मृत व्यक्तींना उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्र्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले असून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *