Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍सचा 'पायल' फेस्‍टीवल

चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍सचा ‘पायल’ फेस्‍टीवल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्‍त्रीयांच्‍या सौंदर्यालंकारात अविभाज्‍य घटक म्‍हणून पायल किंवा पैंजणला महत्‍व आहे. भारतात सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पायललादेखील मोठे स्थान आहे. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.(Chandukaka Saraf and sons pvt ltd) कडून ‘पायल फेस्ट’ची (Payal Festival) घोषणा करण्यात आली आहे….

- Advertisement -

पायल्समधील डिझाइन (Various designs in payal) कालांतराने विकसित झाल्या असून आज त्यास प्राधान्यक्रम मिळताना दिसतो. तरुणी आणि स्त्रियांच्‍या मागणीप्रमाणे पायलची डिझाइन्स देखील आता अपग्रेड झाली आहे. हे लक्षात घेऊनच चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांनी ’पायल फेस्टमध्ये पारंपारिक व आधुनिक डिझाईन्‍स यांचा नाविन्यपूर्ण संगम साकारला आहे.

पायल महोत्‍सवाचे आयोजन ३१ डिसेंबर २०२१ ते ३० जानेवारी २०२२ पर्यंत चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. च्‍या सर्व शाखांमध्‍ये करण्‍यात आले आहे. विविध आकर्षक डिझाईन्‍स व वजनांची पायल फक्‍त रू. ९९९ पासून पुढे या श्रेणी मध्‍ये खरेदीसाठी उपलब्‍ध आहेत. याचबरोबर पायलच्‍या कारागिरीवर १५ टक्‍क्‍यांची सूटही देण्‍यात आली आहे.

पारंपारिक व अत्‍याधुनिक विविध शैलीतील पायल व जोडव्‍यांची विस्‍तृत श्रेणी या महोत्‍सवात सादर करण्यात आली आहे. पायल फेस्‍ट बरोबरच फॅशन मोती या फॉर्मिंग ज्‍वेलरी प्रकारातील दागिन्‍यांचा महोत्‍सवही याच कालावधीत आयोजित करण्‍यात आला आहे. यात मोत्‍याच्‍या दागिन्‍यांचे पारंपारिक व वेस्‍टर्न प्रकारातील असंख्‍य प्रकार सादर केले गेले आहेत.

या महोत्‍सवाअतंर्गत फॅशन मोती या फॉर्मिंग ज्‍वेलरी (Farming Jewelry) प्रकारातील दागिन्‍यांवर ५ ते १० टक्‍के सूट मिळणार आहे. अहमदनगर (Ahemadnagar) येथील शोरूमचा शुभारंभ लवकरच होत आहे. याबाबतची माहिती किशोरकुमार शहा यांनी ‘देशदूत’ला दिली.

आमच्या जवळच्या शोरूमला भेट देऊन ‘पायल फेस्ट’ मधील सुंदर श्रेणीतील स्टायलिश पायलसह प्रत्येक पावलात आकर्षकता वाढवा तसेच फॅशन मोती प्रकारातील दागिन्यानी सौंदर्य अधिक खुलवून दाखवा.

किशोरकुमार शहा, चेअरमन, चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स

- Advertisment -

ताज्या बातम्या