Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशचांद्रयान-२ ने चंद्रावर शोधले पाण्याचे अंश

चांद्रयान-२ ने चंद्रावर शोधले पाण्याचे अंश

इस्त्रोच्या चांद्रयान-२ (Chandrayaan-2) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. चांद्रयानने चंद्रावर (moon) पाण्याचे अंश शोधले आहेत. इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए एस किरण कुमार (A S Kirankumar) यांनी त्यांच्या शोध निबंधात ही माहिती दिली आहे.

मी शरद पवार बोलतोय…फोनने मंत्रालयात धावपळ

- Advertisement -

चांद्रयान २ चे प्रेक्षपण २२ जुलै रोजी करण्यात आले होते. चांद्रयानाला सुखरुप चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविणारा लँडर विक्रम ७ सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंग करण्यास असफल ठरला होता. परंतु त्यात ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर’ (आयआयआरएस) हे उपकरण बसविण्यात आले होते. आयआयआरएस द्वारे टिपण्यात आलेल्या सुरुवातीच्या माहितीमध्ये २९ डिग्री उत्तरेकडे आणि६२ डिग्री उत्तरेकडील अक्षांसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे छोटे छोटे कण आणि मिक्स न झालेले हाइड्रोक्सिल (ओएच) व पाण्याचे (H2O) अणू स्पष्टपणे आढळले आहेत.

पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या आपल्या ४७ दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-२ ने अनेक अवघड टप्पे पार केले. मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या