Thursday, April 25, 2024
Homeक्रीडामराठमोळे चंद्रकांत पंडित देणार केकेआरला प्रशिक्षण

मराठमोळे चंद्रकांत पंडित देणार केकेआरला प्रशिक्षण

मुंबई | Mumbai

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नियमित कोच ब्रेंडन मकालॅम यांना संघाच्या प्रशिक्षक पदावरून नारळ देऊन मध्यप्रदेश संघाला यंदाच्या रणजी हंगामात आपल्या कुशल मार्गदर्शनाच्या बळावर पहिलं विजेतेपद पटकावून देण्यात हातखंडा असलेल्या चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांच्याकडे प्रशिक्षक पदाची सर्व सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे….

- Advertisement -

२०२१ मध्ये आयपीएल (IPL) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या आणि आयपीएल २०२२ मध्ये साखळीत गाशा गुंडाळून माघारी परतणाऱ्या केकेआर (KKR) संघाने काल हा निर्णय जाहीर केला आहे.

याशिवाय कोलकाता संघाचे माजी कोच ब्रेंडन मकालॅम (Brendon Mccullum) आणि नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यात अबोला निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांच्या खांदयावर प्रशिक्षक पदाची जवाबदारी सोपवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सीईओ वेंकी मयसूर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की , कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ हा आमच्यासाठी एक संघ नसून, एक फॅमिली आहे.

याशिवाय चंद्रकांत पंडित आमच्या संघासोबत जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही आयपीएलच्या पुढील सर्व हंगामात निश्चितच चांगलं प्रदर्शन करू असेही ते म्हणाले.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या