Friday, April 26, 2024
Homeजळगाव‘ये खाकी है’ गीतातून कर्तृत्वाला सॅल्यूट

‘ये खाकी है’ गीतातून कर्तृत्वाला सॅल्यूट

सुषलर भालेराव – Jalgaon – जळगाव :

युवाशक्तीसाठी नेहमीच ‘सदरक्षणाय, खलनीग्रहणाय’ या खाकीच्या ‘ब्रीद’ वाक्याचे प्रेरणादायी आकर्षण राहिलेल आहे.

- Advertisement -

पोलिसांमुळेच उपद्रवी तत्वांपासून संरक्षण मिळते तसेच पोलिसांमुळेच आपण समाजात सुरक्षित आहोत, याची जाण सर्वांनाच आहे. त्यामुळे वेळ, काळानुसार पोलिसांची गरज पडते. व त्यावेळी आपल्या कामाची चुणूक दाखवून पोलिसांनी बर्‍याच वेळा आलेल्या आपत्तीशी यशस्वी लढा देवून ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ प्रत्यय दिलेला आहे.

दरवर्षी दिमाखात साजरे होणारे सण-उत्सव आपल्या आयुष्यात रंग भरत असतात. पण या सण-उत्सवाच्या काळाचा आनंद देखील कर्तव्यामुळे बरेच पोलीस बांधव हिरावून बसतात.

सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात देखील पोलिसांनी नागरिकांना माणुसकीची साथ देत खाकीला साजेशे काम करत आहेत.

पोलिसांबद्दल विवेचन केलेल्या कोणत्याही घटना नेहमीच लक्षवेधी ठरतात. हीच एक गोष्ट हेरुन नाट्यकर्मी चंद्रकांत इंगळे यांनी यु-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून गायलेल्या ‘ये खाकी है’ या गीतातून पोलिसांच्या कार्यकर्तुत्वाला सॅल्यूट केलेला आहे.

पोलिसांच्या या कार्याचे प्रेरणादायी गीत नाट्यकर्मी चंद्रकांत इंगळे यांनी गायले असून, तालबध्द केलेय उदय सूर्यवंशी यांनी, व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांची गौरवगाथा सर्वांसमोर उभी केलीय किरण पानपाटील यांनी या गीतातून पोलिसांचे समाजातील स्थान, त्यांच्या कार्यपध्दतीचा गौरव केला गेला आहे.

पोलीस होवून देशाची सेवा करुन पाहणार्‍या तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्याचे कार्य हे गीत करणार असल्याने आज हे गीत 50 हजारांच्या वर व्हीवर्स घेवून सर्वांच्या पसंतीस पडत आहे. इंगळे यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या