Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयचंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज

चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

भीमशक्ती महाराष्ट्र राज्य संघटना काँग्रेससोबत तब्बल 40 वर्षांपासून विविध निवडणुका आणि आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होत कार्यरत आहे.

- Advertisement -

मात्र गेल्या दहा वर्षांत पक्षाकडून भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अथवा सत्तेत वाटा देताना डावलले जात असल्याचा आरोप करीत आता संघटना स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करण्याची तयारी करीत असल्याचे सांगतानाच माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे काँग्रेसवर नाराज असून त्यांनी काँग्रेस सोडण्याचे सुतोवाच केले आहे.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात भीमशक्ती राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.काँग्रेस सोडताना स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा अथवा राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्यायही आपल्यासमोर असल्याचे सांगतानाच दलीत चेहरा नसलेल्या पक्षांकडून आपल्याला ऑफर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

मात्र भीमशक्ती वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचारही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने आपल्याला मंत्रिपद दिले, पण त्यानंतरच्या काळात आपण आणलेल्या योजना ठप्प झाल्या असून भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना महामंडळे, विविध समित्या तसेच विधानपरिषदेसह वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे आपण या निर्णयापर्यंत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, काँग्रेस सोडल्यानतंर कोणत्या पक्षासोबत जाणार यावषियी स्पष्टपणे कोणतेही विधान करण्याचे त्यांनी टाळले.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर अशोक दिवे, राहूल दिवे, बाळासाहेब शिरसाठ, प्रशांत दिवे, भाऊसाहेब साठे संदीप मगर आदी उपस्थित होते. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतला त्याला भीमशक्ती राहाता तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी तालुक्याच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या