Friday, April 26, 2024
Homeजळगावचांदनी रेल्वे स्थानकाची इमारत कोळली

चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत कोळली

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चांदनी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे छत टाली पडल्याची घटना दि. २६ मे रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

या घटनेते कुठल्याही प्रकारची जिवित हाणी झाली नसल्याचे तसेच वाहतुस सुरळी असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी दिली.

रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नेपानगर व खंडवा दरम्यान असलेल्या चांदणी रेल्वे स्थानकाच्या ईमारतीचे छत खाली कोसळल्याची घटना २६ रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या दरम्यान घडली.

दरम्यान या घटनेत कोणतीही जिवति हानी झाली नसली व रेल्वेची वाहतुक सुरळीत असल्याची तसेच जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाअ असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी दिली.

१३ वर्षात इमारत कोसळली

चांदणी रेल्वे स्थानकाच्या या ईमारतीची निर्मिती सन २००७ मध्ये करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत ठेकेदाराकडून या ईमारतीच्या कामाचे कंपलीशन प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. इतक्या कमी काळात ईमारत कशी ढासाळली असा प्रश्‍न उपस्थित होत आहे,

या घटनेत जिवित हानी झाली नसली तरी स्थानकावर उपस्थित प्रवाशांची काही काळ धावपळ उडाली होती. या घटनेत कार्यालयातील समानाचे नुससान झाले आहे. साधारण ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त कण्यात आला आहे.

दुर्घटनेनंतर स्थानकाच्या कामकाजात काही प्रमाणात अडचणी येत आहे. मात्र कामकाज सुरळीत असल्याचे सुत्रानकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच, एडीआरएम मनोजकुमार सिंहा, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, सिनियर डीएसटी निशांत त्रिवेदी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना ठाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या