Wednesday, April 24, 2024
Homeनगरयंदा चांगला पाऊस, अन्नधान्यही मुबलक पिकणार...

यंदा चांगला पाऊस, अन्नधान्यही मुबलक पिकणार…

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिके पिकले जाईल व लग्न विधी मोठ्या प्रमाणात पार पडतील असा कौल कोईक दिलें आहे.

- Advertisement -

तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. बाल भैरवनाथ आणि दिलेला कौल तंतोतंत खरा ठरला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहित यांच्या उपस्थितीत पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम केला जातो.

अजबच! नगर जिल्ह्यातील असे एक गाव जिथे केली जाते दैत्याची पूजा.., गावात मारूतीचं मंदिर नाही

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून पुरोहित विनोद जोशी, जयद्रथ होन व ग्रामस्थ यांच्या मदतीने अठरा नक्षत्र रुपी गाडगाच्या आकाराचे खड्डे घेतले जातात. या एकसारख्या खड्ड्यामध्ये वडाचे पाणे ठेवून या पानांमध्ये सप्तधान्य व पाणी साठविले जाते. रात्रभर ही नक्षत्र रुपी खड्डे झाकून ठेवली जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी ची पुरोहित यांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते. व त्यानंतर‌ चालू वर्षात पर्जन्यमान कसे होईल हे सांगण्यात येते.

नक्षत्र रुपी खड्ड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्ड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील त्या नक्षत्रात‌ मध्यम पाऊस तर ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे कोईक सांगितले जाते. चालू वर्षी रोहीणी, मृग, पुष्ष, आर्दरा, आश्लेषा, मघा, पुर्वा,उत्तरा हस्त अदी नक्षत्रारूपी खड्ड्यात पाणी जास्त निघाल्याने या नक्षत्रात चांगला पाऊस पडणार असल्याचा कौल बाल भैरवनाथ यांनी दिला तर विशाखा अनुराधा जेष्ठा,आश्विन राजा,भरणी प्रधान,चित्ता व स्वाती नक्षत्र रूपी गाडग्यात पाणी कमी व कोरडे निघाल्याने या नक्षत्रात पाऊस मध्यम व कोरडे जाणार असल्याचे सांगितले.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

चालू वर्षी पाऊस चांगला असून अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर पीकणार आहे तसेच लग्नकार्याचे विधीही मोठ्या प्रमाणावर पार पडतील असे पंचांग वाचनाना पुरोहित विनोद जोशी गुरू यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून करोना परिस्थिती असल्याने भैरवनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा रद्द झाली होती मात्र आता परिस्थिती सुधारल्याने भैरवनाथाची यात्रा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती केशवराव होन यांनी दिली.

9 एप्रिल रोजी तेलवन पडणार असून रामनवमी 10 एप्रिल रोजी उपवास चालू होणार आहे. गुरवार दि 14 एप्रिल रोजी यात्रा उत्सव तर शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी जत्रा जंगी हंगामा होणार आहे. चालू वर्षाची यात्रा चांदे मंडळीकडे आली असून त्यांना कसारे मंडळी सहकार्य करणार आहे. यात्रा शांततेत पार करण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केशवराव होन यांनी केले.

यावेळी काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन, रोहिदास होन, सुभाष होन, कल्याण होन, शंकरराव चव्हाण, नारायण होन ,शांतीलाल होन, अशोक होन, कांतीलाल होन, विजय होन, सुधाकर होन, व्ही टी होन, श्रीराम पंचायतन आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य अदी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महादेव मंदिर, शनी मंदिर व खंडोबा मंदिर कळसासाठी सुरुवात केली. कळस पूजा विठ्ठल तुळाजी होन, कल्याण शिवराम होन, धनंजय नानासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. बाल भैरवनाथ मंदिरासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूूर झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महादेव मंदिर, शनीमंदिर खंडोबा, मंदिर जीर्णोद्धारासाठी चांदे व कसारे यात्रा कमिटीच्या वतीने प्रत्येकी एक लाख एक लाख 51 हजार रुपये देणगी रोख स्वरूपात देण्यात आली तर सुभाष रामदास होन यांनी 1लाख अकरा हजार रुपये देणगी मंदिर बांधकाम समितीकडे सुपूर्त केली. चांदकरांकडे यात्रा असल्याने यात्रा समितीची स्थापना करण्यात आली.शेवटी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताावर सर्वांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स… काय आहे प्रकरण?

- Advertisment -

ताज्या बातम्या