Friday, April 26, 2024
Homeक्रीडाफ्रान्सला सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप पटकावण्याची संधी

फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप पटकावण्याची संधी

दोहा | Doha

फिफा वर्ल्डकप २०१८ मध्ये प्रथमच विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावलेल्या फ्रान्स संघाला सलग दुसरा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. फ्रान्सला ५ वेळचा फिफा वर्ल्डकप विजेता ब्राझील संघाच्या ६० वर्षांपूर्वीचा विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी असणार आहे…

- Advertisement -

फ्रान्स संघ दोन दशकातील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी ब्राझील संघाने १९९४, १९९८, २००२ सलग ३ वेळा वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. गतवर्षी फ्रान्स संघाने अंतिम सामन्यात क्रोएशिया संघावर मात करून वर्ल्डकप जिंकला होता.

मात्र मागील वर्ल्डकप विजेत्या संघातील केवळ ४ खेळाडू यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत फ्रान्स संघाचे सदस्य आहेत. अँटोनी, ग्रीजमॅन ऑलिव्हर जिरू आणि किलियन एम्बापे यांचा संघात समावेश आहे. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा फ्रान्स पाचवा संघ ठरला आहे. मोरोक्कोच्या संरक्षण फळीला चारीमुंड्या चीत करत फ्रान्स संघाने अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला आहे.

अंतिम सामना फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना संघात येत्या रविवारी १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता स्पोर्ट्स १८ वर करण्यात येणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्व फुटबॉल चाहत्यांच्या नजरा ३५ वर्षीय लिओनेल मेसीवर खिळलेल्या असतील.

तो आपल्या चपळाईच्या बळावर २०-२२ वर्षांच्या खेळाडूंना कसे नाचवतो? तर एम्बापे सामन्याला कलाटणी देण्यात पटाईत आहे. मेसी या वर्ल्डकप स्पर्धेत ५ गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू मानला जातो.

त्याने आपल्या संपूर्ण करियरमध्ये ११ गोल नोंदवले आहेत. एम्बापे यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत ५ गोल २३ वर्षीय वयात वर्ल्डकप करियरमध्ये ९ गोल करणारा पहिला खेळाडू त्याने १३ सामन्यात ९ गोल केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या