Friday, April 26, 2024
Homeजळगावसमता सैनिक दलातर्फे मराठा आरक्षणास पाठिंबा

समता सैनिक दलातर्फे मराठा आरक्षणास पाठिंबा

चाळीसगाव – chalisgaon – प्रतिनिधी :

समता सैनिक दलाच्या चाळीसगाव तालुका शाखेने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जाहीर पाठिंबा घोषित केला.

- Advertisement -

या बाबतचे निवेदन तहसीलदार आमोल मोरे यांना देण्यात आले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे.

त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला जे प्रचलित १९ टक्के आरक्षण दिले गेले आहे.

त्यास कसला ही धक्का न लागता कामा नये. ओबीसी समाजाला ३४६ जातींसाठी १९ टक्के आरक्षण देवून त्यांच्यावर देखील अन्यायच झालेला आहे. म्हणून मराठा समाजाला कोणतीही अट न घालता त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे.

तोच नियम ओबीसी समाजासाठी देखील लावून त्यांचे देखील आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. २६ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकाद्वारे ओबीसी च्या ३४६ जातींची यादी जाहीर केलेली आहे. (यातील काही हाती वगळून त्यांना विमुक्त जाती संवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.)

या यादीतील अनुक्रमांक ८३ वर कुणबी या जातीचा उल्लेख देखील आहे. त्यात पोट जाती म्हणून लेवा पाटील, लेवा कुणबी, लेवा पाटीदार, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा पाच जातींचा उल्लेख केलेला आहे.

या मराठा समाजाच्या जाती आहेत. म्हणजेच मराठा हा समूह ओबीसी संवर्गात येतो. ही बाब दुर्लक्षित करण्यात येवू नये.

म्हणून मराठा समाजास त्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे. यावर अंमल बजावणी न झाल्यास मराठा व ओबीसी समाजाच्या या मागणी साठी समता सैनिक दल देखील त्यांच्या होणार्‍या आंदोलनात सहभागी राहील.

या निवेदनावर धर्मभूषण बागुल, विजय निकम, भाईदास गोलाईत, स्वप्नील जाधव, विष्णु जाधव, सचिन गांगुर्डे, बाबाझ पगारे, दीपक बागुल, जीवन जाधव, सचिन मोरे, प्रकाश बागुल व विशाल पगारे आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या