सासू, सुनेला ऑनलाइन सव्वा लाखांचा गंडा

by

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

शहरातील स्टेट बँक व जळगाव जनता बँक बँकेतील खातेदार सासू-सुनेच्या, बँक खात्यावरून अज्ञात चोरट्याने

एक लाख 11 हजार 755 रुपये ऑनलाईन खात्यातून परस्पर काढून घेतले आहे. दोघांची फसवणूक झाल्या प्रकरणी शहर पोलीसात चोरट्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हनुमानवाडी येथील रहिवाशी सोनल हर्षल खाबिया यांच्या भारतीय स्टेट बँक खात्यातून 34 हजार 559 रुपये व 555 रुपये तर त्यांच्या सासुबाई कल्पनाबाई खाबिया यांच्या जळगाव जनता बँकेतील खात्यावरून 75 हजार 992 रुपये व 649 रुपये असे एकूण एक लाख 755 रुपये ऑनलाईन खात्यातून अज्ञात चोरट्याने काढून घेतले आहे.

ऑनलाईन व्यवहाराकरीता गुगल पे या अपचा वापर दोघे जण करीत होते. गुगल पे अकाऊंट तपासले असता ही बाब उघडकीस आली.

सोनल खाबिया यांनी 14 रोजी शहर पोलीसात धाव घेवून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 420,66 सी, 66 डी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *