Friday, April 26, 2024
Homeजळगावगिरणा धरण रात्रीतून नव्वदी पार करण्याची शक्यता ?

गिरणा धरण रात्रीतून नव्वदी पार करण्याची शक्यता ?

चाळीसगाव – chalisgaon – प्रतिनिधी :

उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरण(Girana dam) यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणे शंभर टक्के पूर्णपणे भरेल अशी आशा आहे. आज गिरणा धरणाने …

- Advertisement -

८८.९३ टक्के पाणी साठ्यापर्यंन्त मजल मारली असून उद्या पहाटपर्यंन्त हे धरण ९० टक्के भरेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सद्या गिरणा धरण परिक्षेत्रात पाऊस नसला तरी हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा ही धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने ठेंगोडा, हरणबारी आणि चणकापूर या तिन्ही धरणातून २३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आजच्या पहाटेपर्यंन्त गिरणा धरणात १६३२५ द. ल. घ. फू. म्हणजेच ८८.२९ इतका जिवंत पाणीसाठा आहे.

तर भागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंन्त १५५४६ द. ल. घ. फू. म्हणजेच ८४.०७ टक्के इतका जिवंत पाणीसाठा होता.

म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाणीसाठा आहे. यंदाही गिरण धरण शंभर टक्के भरणार असल्याच अंदाज वर्तवला जात असल्याने, शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या