Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनला बेस्ट मेन्टेेनन्सचे पारितोषिक

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनला बेस्ट मेन्टेेनन्सचे पारितोषिक

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनची (Chalisgaon-Dhule Memu Train) प्रामाणिकपणे दुरुस्ती व देखभाल केल्यामुळे मुंबई येथे दि १९ रोजी पार पडलेल्या ६७ व्या रेल्वे संमारभात मध्य रेल्वे (Central Railway) स्तरावरील भुसावळ विभागातील कमी पल्ल्याच्या धावणार्‍या चालीसगांव-धुळे मेमू ट्रेनला पहिल्यादाच बेस्ट मेंन्टेनन्स शार्ट डिस्टेंस ट्रेनचे (Best Maintenance Award) पारितोषिक मिळाले आहे. मध्ये रेल्वेचे मुख्य यांत्रिक इंजीनियर यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. मध्ये रेल्वेच्या भुसावळ यांत्रिक विभागातील चाळीसगांवकरांसाठी ही गौरवास्पद (Glorious) बाब आहे.

खान्देशाची राणी म्हणून ओळख असलेल्या चाळीसगाव-धुळे पॅसेजर कोविड मुळे अडीच वर्षांपासून बंद होती. चाळीसगाव-धुळे पॅसेजर ऐवजी १३ डिसेंबर २०२१ पासून चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू ट्रेन (Chalisgaon-Dhule Memu Train) सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीच्या चार महिन्यांत या ट्रेनच्या दोनच फेर्‍या असल्यामुळे प्रवशांचे प्रचंड हाल होत होत. चाळीसगाव व धुळे येथील अनेक सामाजीक संघटनाकडून या ट्रेनच्या फेर्‍या वाढविण्याचे मागणी केली जात होती. त्यामुळे ११ एप्रिल २०२२ पासून दोन फेर्‍या सुरु करण्यात येणार आली, आणी आता ही ट्रेन पूर्वीप्रमाणेच दिवसातून चार वेळा धावत आहे. चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनने प्रवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून आरामदायक व सुखकर प्रवासाचा (comfortable and pleasant journey) अनुभव येत आहे. परंतू त्यासाठी अनेक रेल्वे कर्मचार्‍याने हात राबत आहेत.

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन सुरु झाल्यापासून तिच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी चाळीसगाव येथील रेल्वेच्या यांत्रीक विभागातील इंजीनियर योगेश थोरात व त्यांच्या टीमकडे आहे. त्यानी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने ट्रेन सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत ट्रेनच्या मेंन्टेनन्सची(Maintenance of train) जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.

ट्रेनची स्वच्छता, यांत्रीक दुरुस्ती व इतर सुविधाची ते काळजी घेत आहे. त्यामुळे ट्रेन सुरु झाल्यापासून तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारच बिघाड झाला नाही. याच कामाची पावती म्हणून मुंबई येथे दि, १९ रोजी पार पडलेल्या ६७ व्या रेल्वे समारंभात मध्ये रेल्वे स्तरावरील भुसावळ डिवीजन मधील चालीसगांव-धुळे मेमू ट्रेनला ‘ बेस्ट मेंटेन शार्ट डिस्टेंस ट्रेनचे ’ (Best Maintenance Award) पारितोषिक मिळाले आहे.

कमी पल्ल्याच्या धावणार्‍या ट्रेनसाठी दरवर्षी पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर व भुसावळ आदि विभागातून दरवर्षी सर्व्हेशन केले जाते आणि पारितोषीक दिले जाते. भुसवाळ विभागातील चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनला पहिलादाच हे परितोषिक मिळाले आहे.

कोविडनतंर नव्या रुपात धावणार्‍या चाळीसगाव-धुळे ट्रेनला परितोषिक मिळाल्यामुळे खान्देवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे चाळीसगाव व भुसावळ येथील यांत्रिक विभागाचे कौतूक होत आहे

चाळीसगाव-धुळे ट्रेनला बेस्ट मेंन्टेनन्स हा एसआर डिएमइ मोहित मंडलेकर, डिएमइ आर.एस.देवरा, एडीएमइ फिरोज राठौड़ यांच्या मार्गदर्शनात इंजीनियर निशिकांत चौधरी भुसावळ, इंजीनियर योगेश थोरात व टीम चाळीसगाव, इंजीनियर रोहित उपाध्याय व टीमने मेहनत घेऊन चालीसगांव धुळे ट्रेनच्या मेंन्टेनन्ससाठी मेहनत घेत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या