Friday, April 26, 2024
Homeजळगावधक्कादायक : आठवर्षीय बालिकेवर अत्याचार

धक्कादायक : आठवर्षीय बालिकेवर अत्याचार

चाळीसगाव – chalisgaon – प्रतिनिधी :

आई-वडील मजूरीच्या कामासाठी शेतात गेले असल्याचा फायदा घेत घरी एकटी असलेल्या आठ वर्षीय बालीकेला तुझे वडिल बोलवत असल्याचे सांगत,

- Advertisement -

तिला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर एकांतात अत्त्याचार केल्याची घटना तालुक्यातील बिलाखेड येथे घडली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून संशयीत विवाहित तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बिलाखेड गावातील मोलमजूर करणारे एक कुटूंब आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह एका लहान मुलास घरी टाकून गेलेलेे असतांना, दि.१८ ऑक्टोबर रोजी त्यांच्याच नात्यातील गोरख भिमराव सोनवणे या २२ वर्षीय विवाहित नराधमाने त्याचा फायदा घेत, दुपारी ३ ते ५ या वेळात आठ वर्षीय मुलीला ओळखीचा फायदा घेत घरातून तुला तुझे वडिल बोलवत असे असे सांगून, दुचाकीवर बसवून घेवून गेला.

त्यानतंर बिलाखेड शिवारातच एका निर्जन जागेत नेवून तिच्यावर अतिप्रसंग केला. सायंकाळी सदर पिडीत बालीकेचे आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार कथन केल्यानंतर आई-वडीलांनी लागलीच शहर पोलीस गाठून तक्रार दिला.

याप्रकरणी शहर पोलीसांत याप्रकरणी कलम ३६३, ३७६ (२)(१) (ख), ३७७ सह बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ (पोस्को) चे कलम ५ (ा)(प) ६,१०,१२, १५,प्रमाणे दाखल करत, आरोपी गोरख सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपी हा विवाहित असून त्याला १ मुलगी देखील असल्याचे समजते. या प्रकरणी पुढील तपास पो. नि. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.मयूर भामरे हे करीत आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील बोरखेडा येथे मुलीवर अत्याचार करुन, हत्याकांड केल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा तालुक्यातील बिलाखेड येथे बालिकेवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या