Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगाव : सप्तशृंंगी यात्रेसाठी २० जादा बसेस

चाळीसगाव : सप्तशृंंगी यात्रेसाठी २० जादा बसेस

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी रविवारपासून चाळीसगाव आगारातून जादा बस सोडल्या जात आहे. त्यात गुरुवारी १० व शुक्रवारी २० जादा बस सोडल्या जाणार आहे. या बससेवेतून आगाराला चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला फटका बसला. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एसटी कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आता टप्प्याटप्प्याने कर्मचारी कामावर येत आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने चालक व वाहकांची भरती झाली आहे. त्यांच्या मदतीने बससेवा सुरू झाली आहे.

चाळीसगाव आगात आजघडीला १७० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर अजुनही निम्मे म्हणजे १९० कर्मचारी संपावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव कोरोनामुळे झाला नव्हता. यंदा चैत्रोत्सव होत असून, देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी चाळीसगाव आगारातून जादा बस सोडण्यात येत आहे. संकाळी ७ वाजेपासूनच नांदुरी गडासाठी बस सुटता आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार दिवसभरातून बस सोडण्याचे नियोजन चाळीसगाव आगारातर्फे करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव कोरोनामुळे बंद होता. परंतू यंदा यात्रोत्सव होत असल्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी चाळीसगाव आगारातर्फे गंडावर देवीच्या दर्शनासाठी, जादा बसेस सोडण्यात येत आहे. भाविकांच्या मागणीनूसार बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी बस सेवा लाभ घेवून सुरक्षित प्रवास करावा.

संदिप निकम, आगार व्यवस्थापक

- Advertisment -

ताज्या बातम्या