Thursday, April 25, 2024
HomeधुळेPhotos # श्री एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवाला सुरुवात

Photos # श्री एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवाला सुरुवात

धुळे । Dhule प्रतिनिधी

खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या (Kulaswamini mother Ekvira Devi) चैत्र यात्रोत्सवाला (Chaitra Yatra festival) आज दि.15 एप्रिल पासून प्रारंभ (Start) झाला. दोन वर्षानंतर यात्रा भरल्यामुळे भाविकांनी दर्शनासह जाऊळ उतरविणे, नवसपूर्ती, कुळधर्म, कुळाचारासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. आज दिवसभरात सुमारे 1800 बालकांचे जाऊळ देवीला अर्पण करण्यात आले. भाविकांची एकाचवेळी गर्दी होवू नये म्हणून यात्रोत्सव (Chaitra Yatra) काळात पहाटे पाचपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले (temple is open to devotees) करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे यात्रा (Chaitra Yatra) भरली नाही, त्यामुळे यंदा भाविकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी (Crowds for darshan) केली आहे. दुपारी तप्त उन्हातही भाविक दाखल होतांना दिसून येत आहेत. देवीचा जयघोष करीत भाविक रांगेत दर्शन करीत आहेत. मंदिर परिसर व नदी किनारी वाहनांच्या लागलेल्या ताफ्यावरून गर्दीचा अंदाज येत आहे.

ही गर्दी लक्षात घेवून मंदिराकडून नियोजन (Planning) करण्यात आले आहे. दर्शनासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. जाऊळ, नवस आदी कार्यक्रमांसाठी मंदिर परिसरात मंडप टाकून सावलीची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धुळ्यासह जवळील जिल्ह्यातून व महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड येथून भाविक दाखल झाले असून आलेल्या अनेक भाविकांकडून बालकांचे जाऊळ काढण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराकडून 30 न्हावींना बोलावण्यात आले आहे. दिवसभरात साधारणत: 1800 पेक्षा अधिक जाऊळ उतरविण्यात आले.

याबरोबच पांझरा नदीपात्रात (Panjra river) दुकाने, (Shops) स्टॉल, पाळणे दाखल झाले असून, त्यांची मांडणी व जोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेत साधारणपणे 150 दुकाने असतील. तर 12 पाळणे दाखल झाले आहेत. त्यांना महापालिकेकडून (Municipal Corporation) सुविधा देण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

याबरोबरच मंदिर प्रशासनाकडून खासगी 40 सुरक्षा रक्षक (सुरक्षा रक्षक) तैनात करण्यात आले आहेत. तसेच 16 सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. दरम्यान यंदा प्रथमच एकवीरा देवीची पालखी (Palkhi) यात्रा ऐवजी नवीन तयार केलेल्या पितळी रथात यात्रा काढण्यात येणार आहे. 5 टन वजनाचा हा पितळी रथ (Brass chariot) असून प्रथमच या रथातून देवीची चांदीची मूर्ती ठेवून शहरातून उद्या शनिवारी दि. 16 रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

मंदिरापासून नेहरू चौक, पंचवटी, मोठा पूल, गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, चैनी रोड, खोलगल्ली, तेथून पारोळा रोडवरील रेलन दुकान, आग्रा रोडमार्गे रथ शोभायात्रा थेट मंदिरापर्यंत येईल.

तसेच भाविकांना मुक्कामासाठी मंदिराच्या आत परिससरात 15 खोल्या असून त्यात साधारणपणे 70 ते 80 भाविक राहू शकतात. तर मंदिरासमोरही महापालिकेचे भक्त निवास आहे. त्यातही 16 खोल्या आहेत. त्यात 200 भाविकांची सोय होऊ शकते. मंदिर दिवसभर खुले असल्याने भाविकांनी एकाच वेळी गर्दी न करता दिवसभरात दर्शन घेऊन गर्दी टाळावी, मौल्यवान वस्तूंची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन ट्रस्टींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या