Saturday, April 27, 2024
Homeनगरफोटोच्या नादात सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरीला

फोटोच्या नादात सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरीला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डोंगरगण (ता. नगर) येथील रामेश्वर मंदिराजवळ सीताची न्हाणी येथील धबधब्याजवळ फोटो काढत असलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी चोरली. रविवारी दुपारी तीन वाजता सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सीमा किरण जाधव (वय 29, रा. अकोळनेर, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सीमा जाधव या कुटुंबांसह डोंगरगण येथील रामेश्वर मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. सीताची न्हाणी या ठिकाणी असलेल्या धबधब्याशेजारी फोटो काढण्यासाठी त्या थांबल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी लहान मुलीला उचलून घेतले. त्यावेळेस पर्स खाली ठेवली होती. दोन चोरट्यांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची या पर्स चोरली.

यामध्ये सव्वा तीन तोळे सोन्याचे गंठण होते. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गांगर्डे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या