Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर साखळी उपोषण मागे

पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर साखळी उपोषण मागे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे या मागणीकरिता सुरू असलेले साखळी उपोषण (Chain hunger strike) आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) माजी नगरसेवक दिनकर पाटील व शिवसेना शिंदे गट महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांची भेट करून त्यांनी येत्या काही दिवसांतच या विषयावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट करून देऊन सदर प्रश्न मार्गी लावून देण्याचे आश्वासन देत साखळी उपोषण मागे घ्यायला सांगितले…

- Advertisement -

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबड गाव (Ambad Gaon) अंबड औद्योगिक वसाहत चुंचाळे, दत्तनगर, घरकुल यादी परिसरातील वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली परिसरात स्वाक्षरी मोहीम काढून ८ ऑक्टोबरपासून नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पोलीस ठाण्याच्या मागणी संदर्भात निवेदन देणार होते. मात्र पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) उपायुक्त विजय खरात यांनी याप्रकरणी मध्यस्थी करून भुसे यांची आज भेट करून देण्याचे आश्वासन दिले होते.

पंरतु या विषयासाठी प्रश्न सतत लावून ठेवण्याकरिता दत्तनगर परिसरामध्ये (दि.८) साखळी उपोषण सुरू होते. यावेळी या प्रकरणाची दखल घेत आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेवक दिनकर पाटील व शिंदे गट महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पालकमंत्री भुसे यांची भेट करून देत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट करून देण्याचे आश्वासन देत अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना सदर पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेशीत केले.

दरम्यान, याप्रसंगी साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे,रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली विष्णु फडोळ,उत्तम मटाले,शशिकांत दातीर,काकडे महाराज,अजय पाटील,काद्री ,नितीन दातीर,मनोज दातीर,गोकुळ दातीर,गणेश दातीर,सतीश आरोटे,रामनाथ साळवे,समाधान दातीर, अरुण दातीर,समाधान शिंदे आदींनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या