Sunday, April 28, 2024
Homeनाशिक'सीईटीपी' उभारणेबाबत आढावा सादर करणार

‘सीईटीपी’ उभारणेबाबत आढावा सादर करणार

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकच्या उद्योगक्षेत्रातील प्रस्तावित सीईटीपी प्रकल्प हा झेडएलडी याअतिरिक्त प्रकल्पामुळे महागडा होत आहे.

- Advertisement -

या प्रकल्पाऐवजी फक्त सीईटीपी उभारणे शक्य आहे किंवा कसे? याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळे पाच विभागांच्या पाच प्रतिनिधीची कमिटी तयार करण्यात आली असून, लवकरच त्यावर सविस्तर माहिती घेऊन, आढावा सादर केला जाणार असल्याचे नाशिक सीईटीपी फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मागील आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जॉइंट डायरेक्टर व्ही. मोटघरे यांच्या आदेशावरून 50 उद्योगांना सीईटीपी न उभारल्याबद्दल परवाने नूतनीकरण न करता कारखाने बंद करण्याची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खा.हेमंत गोडसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून व विविध खात्यांच्या मंत्र्यांना संबंधित प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्याने समितीचा पंधरा दिवसात अहवाल सादर केल्यानंतर या कार्यवाही वर विचार केला जाईल असे निश्चित करण्यात आले.

या कमिटीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रिन्सिपल सायंटिफिक ऑफिसर डॉ.अमर सुपाते,‘नीरी’चे प्रतिनिधी, मनपा व नासिक सीईटीपी फाऊंडेशनचे असे पाच प्रतिनिधी या समितीवर नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीच्या माध्यमातून प्रक्रियेत द्वारे शुद्ध केलेले क्षार युक्त पाणी मनपाच्या भूमिगत गटार प्रकल्पाद्वारे वाहून नेणे किती संयुक्तिक राहील, याबाबत अहवाल सादर करणार आहे. तसे न झाल्यास झेडएलडीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारावा लागणार आहे. यामुळे मूळ प्रकल्पाच्या 30 ते 40 टक्के खर्च वाढून जाणार आहे. तो वाचावा व तातडीने प्रकल्प पूर्ण करता यावा यासाठी हा विचार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या