Wednesday, April 24, 2024
Homeनगरहयातीचा दाखला न दिल्यास जुलैपासून अनुदान बंद - तहसीलदार

हयातीचा दाखला न दिल्यास जुलैपासून अनुदान बंद – तहसीलदार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

विविध योजनाच्या निराधार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी उत्पन्नाचा व हयातीचा दाखला दरवर्षी सादर करावा लागतो. 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत दाखला सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत उत्पन्नाचा व हयातीचा दाखला सादर न केल्यास 1 जुलैपासून निराधारांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

- Advertisement -

केंद्र व राज्य सरकार मिळून अशा सहा योजना निराधारांसाठी कार्यरत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विविध योजनांची मिळून राहाता तालुक्यात 12650 लाभार्थी असून त्यांना प्रतिमहा 1 कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात येते. मागील वर्षी या अनुदानापोटी 15 कोटी 24 लाख रुपये शासकीय योजनेअंतर्गत प्राप्त झाले होते. या लाभार्थ्यांना प्रतिमहा 1000 रुपये तर लाभार्थी महिला विधवा व तिला एक अपत्य असल्यास 1100 रुपये, विधवा महिलेचे दोन अपत्य असल्यास 1200 रुपये अर्थसहाय्य सरकारकडून दिले जात असते.

योजना संजय गांधी निराधार योजना 4527 लाभार्थी, श्रावण बाळ निराधार योजना 5309 लाभार्थी, तातू इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना 2688 लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा योजना 126 लाभार्थी, इंदिरा गांधी अपंग योजनेचा एकही लाभार्थी नाही. लाभार्थीनी उत्पन्नाचा व हयातीचा दाखला राहाता तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात सादर करायचा असल्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात राहाता तालुक्यात वेगवेगळे योजनेअंतर्गत 12659 लाभार्थ्यांना प्रतिमहा 1 कोटी 27 लाख रुपयांचा लाभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनामार्फत दिला जातो. शासकीय नियमानुसार लाभार्थ्यांनी तात्काळ हयातीचा व तलाठी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात जमा करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

– शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या