Monday, April 29, 2024
Homeनगरमुख्य अधिकार्‍यांनी दिली सुगाव सेंटर, राजूर व अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट

मुख्य अधिकार्‍यांनी दिली सुगाव सेंटर, राजूर व अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

जिल्हा नियोजन अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयात 15 जून पर्यत 100 बेड क्षमतेचा ऑक्सीजन प्लॅन्ट सुरु होईल व लवकरच आदिवासी उपयोजनेतुन तालुक्यात दुसर्‍या ऑक्सीजन प्लॅन्टचेही काम सुरू होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आज शनिवारी अकोले तालुक्यात येऊन सुगाव खुर्द कोविड सेंटर,राजूर ग्रामीण रुग्णालय व अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.यावेळी त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात क्सीजन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी डॅा.शशिकांत मंगरुळे,तहसीलदार मुकेश कांबळे,जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे,डॅा.बाळासाहेब मेहेत्रे,डॅा.सुनिल साळुंके, राजुर ग्रा.रु.चे डॅा.दिघे,मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदि उपस्थित होते.

यावेळी ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी करताना ते म्हणाले कि हा प्लॅन्ट 100 क्सिजन बेड क्षमतेचा आहे हा 15 जून पर्यत कार्यान्वित होईल यातुन अकोले ग्रामीण रुग्णालयात तात्काळ 50 ऑक्सिजन बेड सुरू करुन लवकरच 100 बेड करण्यात येईल तसेच अकोले तालुक्यासाठी आदिवासी उपयोजनेतुन दुसरा क्सिजन प्लॅन्ट ही मंजूर होऊन कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच सुगाव कोविड सेंटर येथील मृत्यु बाबत विचारणा करुन फारच कमी क्सिजन लेवल असलेले व जे जास्त क्रीटीकल आहेत असे रुग्ण सुगावला अ‍ॅडमिट न करता संगमनेर अथवा नगरला पाठवण्याच्या सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या