Friday, April 26, 2024
Homeनगरचांगले प्रतिनिधी निवडून दिले नाही म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा बसला नाही -...

चांगले प्रतिनिधी निवडून दिले नाही म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा बसला नाही – मुख्याधिकारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिलेले नसल्यामुळे श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसला नाही, जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पुतळा बसविता येणार नाही, असे स्पष्ट मत नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार होऊन अनेक वर्षे झाली. त्याचे भाडे भरपूर झाले असून हा पुतळा पालिकेने आणावा, अशी मागणी अमित मुथा यांनी मुख्याधिकारी शिंदे यांच्याकडे केली असता मुख्याधिकारी शिंदे म्हणाले, पुतळे बसवणे पालिकेचे काम नाही, नागरिकांना नागरी सुविधा देणे हे पालिकेचे काम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काही पैसे देणे बाकी आहे.

अजून भाडे सुध्दा दिलेले नाही. जोपर्यंत जागा निश्चित होत नाही, तोपर्यंत पुतळा श्रीरामपुरात आणला जाणार नाही. पुतळा ठेवण्यासाठी पलिकेकडे जागा उपलब्ध नाही, त्याची देखभाल कोण करणार? असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी आलेली आहे. त्यानंतर अशी कामे होत राहतील, असेही ते म्हणाले.

उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार

उपोषण करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. जैन समाजातील अंतर्गत वाद आहे. समाजाचे काही नागरिक उपोषणाला बसत आहे. उपोषणकर्त्यांनी उपोषण करू नये, असे पत्र त्यांना दिलेले आहे. जरी ते उपोषणाला बसले तरी त्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल, असे श्रीरामपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले. शहरातील स्थानकवासी जैन संघाचे अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेने कारवाई करावी, या मागणीसाठी आज 14 जुलैपासून पालिकेसमोर चक्री उपोषण करणार असल्याचा इशारा अभय मुथा, सतीश चोरडीया, प्रविण टाटीया यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या