मुख्याधिकारी दिघे यांची बदली रद्द करा

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकारी दिघे यांची बदली रद्द व्हावी तसेच त्यांना किमान वर्षभर मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी दुपारी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.

मुख्याधिकारी सतीश गणपत दिघे यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शिर्डी शहरात अनेक विकास कामे मार्गी लावली. नगरपंचायतीला स्वच्छतेसाठी पंधरा कोटी रुपये बक्षीस मिळवून दिले. केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवून शहरातील नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.

शहरात वर्षाकाठी देश विदेशातील तीन ते चार करोड भाविक साईदरबारी हजेरी लावतात.त्या अनुषंगाने शिर्डीत स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वृक्षारोपण, ग्रिन पार्क असे उपक्रम राबविले आणी पूर्णत्वास देखील आणले.शहर कचरामुक्त करून घनकचरा प्रकल्प उभारला. अवघ्या तीन वर्षांत शिर्डी शहर स्वच्छ व सुंदर केल्याने अजूनही काही प्रकल्पांचे काम अपूर्ण आहे. त्यांची बदली झाल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

सोशल मीडियावर बदली रद्द व्हावी यासाठी अनेकांनी पोस्ट टाकून बदली रद्द व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी यांनीही धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

याप्रसंगी साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, हरिश्चंद्र कोते, रवींद्र गोंदकर, पोपट शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, साईनिर्माण करिअर अ‍ॅकेडमीचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते, दीपक वारूळे, मुकुंद गोंदकर, गणेश कोते, अभिजित कोते, विकास गोंदकर,अमोल सोमवंशी, साई कोते, स्वप्निल सोमवंशी,आकाश कोते,आकाश त्रिपाठी, शुभम कोते, ऋषिकेश माळी, अर्थव कोते,आकाश त्रिभुवन, सुधिर सुपेकर, प्रतिक कोते, हर्षल कोते, मयुर कोते, बालू कोते, रवींद्र महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *