Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसिन्नर तालुक्यात करोना मृत्यूचे शतक

सिन्नर तालुक्यात करोना मृत्यूचे शतक

सिन्नर । Sinnar

शहरासह तालुक्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून तालुक्यात आजपर्यंत करोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या शंभर इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

सिन्नर तालुक्यात करोना महामारीचा प्रसार झपाट्याने सुरू असून अजूनही नागरिकांमध्ये याबाबत काहीच भीती नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात अद्याप 5 हजारांवर नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला होता असून 4420 रुग्ण बरे झाले. यात सध्या उपचार घेत असलेले 408 रुग्ण असून मृतांची संख्या शंभर इतकी झाली आहे.

अद्यापही रुग्णांची संख्या वाढतच असून मनुष्यबळ कमी असल्याने आरोग्य सेवकांंची चांगलीच धावपळ उडत आहे. चार दिवसांपासून दररोज शंभर रुग्ण वाढत असून चार दिवसांत 438 रुग्णांची नव्याने भर पडल्याने तालुका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारपर्यंत 56 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटर येथे 80 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरात फिरून पाहणी केली.

यावेळी एका मिठाईच्या दुकानाला सील केले तर एका हॉटेलवर दंडात्मक कारवाई देखील केली. तरीही शहरात अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या